तुळजापूर प्रतिनिधी
जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणा देत सामान्य रयतेसह मावळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठीकणी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस व पुतळ्यास राजेंना अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी केली होती.
देवराज मित्र मंडळाच्या वतीने अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती निमीत्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी युवा नेते कृष्णा भैया रोचकरी, तुळजापूर तालुका देवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष ऍड. उदय भोसले, बाळासाहेब कदम, रामदास पवार, प्रमोद डोंगरे, नानासाहेब माने व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
