Village during Shivkalin | तुळजापूरकरांनी अनुभवले शिवकालीन गाव ; रामवरदायिनी प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांनी साकारले चालते बोलते शिवकालीन गाव

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 वी जयंती निमीत्त शहरातील रामवरदायिनी प्राथमिक शाळा तुळजापूर येथील मुख्याध्यापिका श्रीमती शिवणे मॅडम यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याची देही याची डोळा याची प्रचिती घेत तुळजापूरकरांनी शिवकालीन गाव या संकल्पनेतून विद्यार्थ्यानी साकारलेला दिमाखदार चालता बोलता देखावा अनुभवला.  


यामध्ये विध्यार्थ्यानी पारंपारिक वेशभूषा केली होती. विज्ञानाच्या युगात लोप पावत चाललेला भारतीय संस्कृतीचा वारसा आज या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांसमोर यावा हा शुद्ध हेतू होता. यामध्ये पारंपरिक जाते, लोणी काढण्याची पद्धत, चुलीवरील स्वयंपाक, बैलगाडी आणि इतरही देखावे केले होते. प्रमुख आकर्षण भवानीमातेनी शिवरायांना दिलेली तलवार हे होते.  



कुमारी सिद्धी जाधव हीने शिवगर्जनेने सर्व प्रेक्षकांचे मन जिकून घेतले. विद्यार्थ्यांची भाषणेही झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक हणमंते सर, मुळे सर , दंतकाळे सर, सिंदफळकर सर , थोरात सर , वाघ सर , अभिजीत भोसले सर व शिक्षिका श्रीमती काजळे मॅडम , चव्हाण मॅडम, पोतदार मॅडम, काशीद मॅडम, टोंपे मॅडम, पिनिता शिरसट यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top