एनरिच सोलार सर्व्हिसेस कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणुकीमुळे शेतकरी कुटुंबाचे आमरण उपोषण

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील दहिवडी गावालगत असणाऱ्या सोलार कंपनीने शेतकरी कुटुंबाची भाडेपट्ट्यावर जमीन घेऊन ठरल्या प्रमाने भाडे न दिल्याने शेतकरी कुटुंबाने गुरुवार दि. 14 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे आमरण उपोषणास बसले आहेत.


दहिवडी शिवारात सौ.सिताबाई रामा उर्फ राम गोरे यांचे नावे जमीन आहे. या जमिनीतून ३३ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत पोलांची लाईन उभी करण्यात आलेली होती. याकरिता कंपनीसोबत रितसर करार देखील करण्यात आलेला होता. यामध्ये कंपनीने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाची रक्कम दिली परंतु आजपर्यंतच्या आर्थिक वर्षाची रक्कम देण्यास टाळटाळ सुर केली. गोरे यांनी कंपनी तसेच शासकीय दरबारी अर्ज विनंत्या केल्या परंतु, कोणत्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही. कंपनीचे असणारे संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिली. या सर्व प्रकारच्या समस्यांना कंटाळून गोरे दांपत्य आज दि. १४ मार्च २०२४ पासून आमरण उपोषणास बसलेले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top