शहरातील 158 कोटीच्या विकास कामाचा आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

मुखमंञी एकनाथ शिंदेनी दाखवलेली हिम्मत  उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस यांची ताकदपुर्ण नियोजन व उपमुखमंञी अजित पवार लावलेली ताकद यामुळे महायुती सरकार अस्तित्वात येवुन रोज नवनवीन प्रकल्प हाती  घेत असल्याचे प्रतिपादन आ राणाजगजितसिंहजी पाटील यांनी केले. 


नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील 158 कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पाचा उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी युवा नेते विनोद गंगणे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी  नारायण नन्नवरे चेअरमन जिल्हा मजूर फेडरेशन   तालुकाध्यक्ष संतोष बोबडे दुधसंघ चेअरमन बाळासाहेब शिंदे भाजपयुवामोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले शहराध्यक्ष शांताराम पेंदे  कृषी उत्पन्न बाजार समिती सभापति सचिन  पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अमरराजे परमेश्वर अध्यक्ष श्री तु.भ.पु.मंडळ सज्जनराव साळुंके, विशाल रोचकरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोकुळ शिंदे  तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी, आनंद पांडागळे, नागेश नाईक,  तानाजीराव कदम, पंडितराव जगदाळे, किशोर साठे  अमर  हंगरगेकर, नानासाहेब लोंढे, विनोद पलंगे,  संभाजी पलंगे, नरसिंग बोधले, माऊली भोसले, बापूसाहेब भोसले, औदुंबर कदम महेश चोपदार, विजय  कंदले, राजेश्वर कदम, लखन पेंदे, नरेश अमृतराव, संजय शितोळे अदि  व्यासपीठावर उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना आ पाटील म्हणाले की येत्या कृष्णा खोऱ्यातील पाणी  पावसाळ्यात रामदऱ्यात पाणी येणार आहे तालुक्यात सहा एमआयडीसी उभारल्या जाणार आहेत त्यात तामलवाडी येथे ३५० ऐकरवर असुन येथे सोलापूर चे उधोजक येण्यास तयार आहेत कारण येथे त्यांना सवलती मिळणार आहे तसेच व्होर्ठी येथे ही एमआयडीसी उभारली जाणार असुन ऐकुण दहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे तिर्थक्षेञ तुळजापूर धार्मिक पर्यटन स्थळ होण्यासाठी प्रयत्न चालु आहेत वर्षभरात सध्या एक कोटी भाविक येतात ती संख्या तीन कोटीवर नेण्याचे नियोजन आहे, येथे अधावत शाळा व मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटल  अँरो प्लँटो अभ्यासीका  युपीएससी एमपीएससी  शिक्षणासाठी उभारले जाणार आहे तसेच आहिल्यादेवीचा व अण्णाभाऊ साठे पुर्णाकृती पुतळाही लवकर उभारला जाणार आहे, येथील  अर्थकरण बळकट  सुदृढ करण्यासाठी प्रयत्न चालु आहेत यासाठी प्रथम छोटे छोटे विषय मार्गी लावले जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top