तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर जिल्हा रुग्णालय हे शंभर बेडचे रुग्णालय आहे, रुग्णालयात रात्री अपरात्री अपघात झालेले रुग्ण येत असतात ,या दरम्यान रात्री येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून नेहमीच गोंधळ होत असतो ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय डॉक्टर,कर्मचारी यांना अनेक वेळा रुग्णांच्या सोबतच्या नातेवाईक यांच्या कडून शिवीगाळ होण्याचे प्रकार घडलेले आहेत.
तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे अनेक भाविक ही उपचारासाठी येत असतात त्यांना ही अशा त्रासाला सामोरे जावे लागते, अशावेळी दर वेळा पोलीस स्टेशन तुळजापूर येथे संपर्क करावा लागतो तिथून पोलीस येतात परंतु असे प्रकार होऊ नये म्हणून तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी करण्यासंदर्भात रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
