सेवा आटली, तहान कायम, पाणपोई सुरु होईल का ?

mhcitynews
0

 


सामाजिक संस्थांना पाणपोई सुरू करण्याचा विसर!

तुळजापूर प्रतिनिधी 

वर्षभर विविध उपक्रमाद्वारे सामाजिक कार्याचा डांगोरा पेटवणारे आणि आपल्या नावाच्या पुढे सामाजिक कार्यकर्ते लिहिणारे तथाकथित समाजसेवक यांना यंदाचा अर्धा उन्हाळा संपत आला तरी गोरगरीब, पादचारी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची पानपोई सुरू करावी या बाबीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.


तुळजापूर शहर व परिसरात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे हौद खुले करणारे सामाजिक कार्यकर्तेही यावर्षी त्यांना विसर पडला की काय ते दिसत आहे. तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भवानी रोड, मंगळवार पेठ, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन आदी भागांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक - भगिनी कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर येत असतात. परंतु अर्धा उन्हाळा संपत आला आहे तरीसुद्धा एकाही सामाजिक कार्यकर्ता असो अथवा सेवाभावी संस्थेला पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करावी, याचे भान राहिले नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या कामात मशगूल आहेत . वेळीच या पाणपोया सुरू झाल्या की त्याचा निश्चितच फायदा ग्रामीण भागातील ग्रामस्थ आणि शहरातील पायी चालणारे नागरीक यांना उपयोगी पडणार आहे.




नगर परिषद मुख्याधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर व तहसीलदार अरविंद बोळंगे यांनाही विसर


सुट्टीच्या दिवशी हि कार्यालय सुरु ठेऊन थकबाकी वसुल करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला शहरात येणाऱ्या भाविक भक्तांची पिण्याच्या पाण्या अभावी होणारी हेळसांड दिसत नाही का असा प्रश्न पडत आहे. तर तहसीलकार्यालय येथे शासकीय कामकाजानिमित्त तालुक्यातून येणाऱ्यांची संख्या अधिक असून ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची येथे वर्दळ असते तापमाचा पारा वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांची तहान भागवीने हे तहसीलदार यांचे पन कर्तव्य आहे.

 


गोरगरिबांचे, पादाचारी लोकांचे, आशीर्वाद आणि सर्वसामान्यांचे आशीर्वाद जर मिळवून घ्यायचे असतील तर पाणपोया त्वरित सुरू करणे हे सामाजिक कार्यकर्त्याची कर्तव्य आहे.



त्याचबरोबर मतांसाठी गावोगाव फिरून मताचा जोगवा मागणारे तथाकथित पुढारीसुद्धा या पानपोयीपासून दूर आहेत. त्यांनीही पानपोई सुरू करून जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top