" वोट फ्रॉम होम " अनुषंगाने जिल्हा नियोजन भवन येथे प्रशिक्षण संपन्न

mhcitynews
0

धाराशिव प्रतिनिधी 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 चे अनुषंगाने 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती व दिव्यांग व्यक्ती यांचे घरी जाऊन मतदान घेण्यात येणार असून त्या अनुषंगाने 241 तुळजापूर विधानसभा मतदार संघाकरिता एकूण 30 टीम करण्यात आल्या असून. त्यांचे प्रशिक्षण आज जिल्हा नियोजन भवन धाराशिव येथे आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणासाठी 42 क्षेत्रीय अधिकारी, 38 केंद्राध्यक्ष, 40 सहाय्यक केंद्राध्यक्ष आणि 36 सूक्ष्म निरीक्षक उपस्थित होते. सर्वांना घरोघरी जाऊन मतदान घेण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आले. दिनांक 1 मे ते 3 मे या कालावधीत 85 वर्षावरील 616 व्यक्ती व 118 दिव्यांग व्यक्ती यांचे घरोघरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे.

यावेळी निरीक्षण अधिकारी प्रवीणकुमार धरमकर उपजिल्हाधिकारी रोहयो, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार डव्हळे, तहसीलदार तुळजापूर अरविंद बोळंगे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top