तुळजापूर प्रतिनिधी
विनोद पिटू गंगणे मित्र परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे इफ्तार पार्टीचे नियोज जामा मस्जिद येथे हिंदु मुस्लीम एैक्य अबाधित राहिले पाहिजे आणि हा संदेश पुढील पिढीत जाऊन त्यांचा अंगीकार झाला पाहिजे या प्रामाणिक हेतुने विनोद पिटूभैया गंगणे हे गेली अनेक वर्ष हे नियोजन करीत आहे.
संपूर्ण जगामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन रमजानच्या पवित्र महिन्यातील इफ्तार पार्टीचा सण साजरा केला जातो. मानवतेच्या भावनेतून सर्व धर्मीयांनी एकमेकांचे सण साजरे केल्याने समाजातील एकोपा वाढण्यास मदत होते. असे सामाजिक उपक्रम राबविले जावेत यासाठी प्रयत्न व्हावेत कुठलाही अफवांवर विश्वास न ठेवता , समाजा समाजामध्ये तेढ निर्माण न होता सामाजिक सलोखा हा कायम जपला जावा असे मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, बापूसाहेब कणे, नरेश अमृतराव, विजय गंगणे, विजय कंदले, पंडित जगदाळे, मनोज गवळी, विशाल छत्रे, राहुल भोसले, अभिजीत कदम, बाळासाहेब भोसले, शिवाजी बोधले, शांताराम पेंदे, किशोर गंगणे, अविनाश गंगणे, राजेश्वर कदम, किशोर साठे, राम चोपदार सह मित्र मंडळाचे पदाधिकारी तसेच मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

