तुळजापूर प्रतिनिधी
इस्लाम धर्मामध्ये रमजान महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात सर्व मुस्लिमांसाठी नमाज पढने व उपवास करणे हे अनिवार्य आहे, लहान मुलापासून वृद्धांपर्यंत या महिन्यात उपवास ठेवतात घरात आई- वडिलांनापाहून मुला मध्ये ही उपवास ठेवण्याचा ईच्छा जागृत होऊन. लहान मुले आणि लहान मुली मोठ्याचे अनुकरण करतात आणि उपवास करतात. त्यांच प्रमाणे तुळजापूर शहरातील उमेरा समीर शेख हीने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी मोठ्यांचे अनुकरण करीत तापमाचा पारा वाढल्याने अंगाची लाही लाही होत असताना सुद्धा उपवास धरित पहीला रोजा पूर्ण केला. रोजा धरून पूर्ण केल्यामुळे तीचे आई, वडिल, आजी आजोबा मुस्लिम बांधवाकडून, मौलाना, धर्मगुरु, नातेवाईकांकडुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
