ओमराजे निंबाळकर, अर्चनाताई पाटील का तिसराच कोणी ?
सिद्दीक पटेल
उस्मानाबाद (धाराशिव )लोकसभा मतदारसंघातील निवडणुकी चे बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपलाच विजय होणार अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर हेच पुन्हा निवडून येतील असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे तर यंदा महिला खासदार म्हणून अर्चनाताई पाटील हेच निवडून येणार असे महायुतीच्या नेत्या कडून सांगण्यात येत आहे तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यास दुरंगी वाटणारी लोकसभेची निवडणूक तिरंगी होईल यात मात्र शंका नाही गुढीपाडव्याच्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवार आपल्या घरावर विजयाची गुढी उभारत आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या विजयाची गुडी कोण उभारणार ? सर्वच उमेदवारांनी आपल्या विजयाची खात्री दिली आहे लोकसभा निवडणूक पहिल्यांदाच लढवीणाऱ्या अर्चनाताई पाटील यांना दिल्लीत जाऊन कामे करायची आहे. तर ओमराजे निंबाळकर यांनाही शेतकरी, बेरोजगार, मजूर विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्तीसंदर्भात लोकसभेत प्रश्न मांडायचे आहेत तर अनेक जणांना विविध प्रश्न मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी देशाच्या सर्वोच्च संसदेत जायचे आहे. एकंदरीत प्रत्येकाने आपल्या विजयाची हमी दिली असून उस्मानाबाद जिल्ह्यातील लाखो मतदार कोणत्या उमेदवाराच्या लोकसभा विजयाची गुढी उभारणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
