तुळजापूर प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचा मार्च 2024 च्या एस. एस. सी. परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून त्यामध्ये एकूण 64 परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विशेष प्राविण्यासहीत 41 विद्याथी उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणी मध्ये एकृण 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर द्वितीय श्रेणी मध्ये 07 विद्यार्थीं व 01 विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून कु. शिवगुंडे प्रणव परमेश्वर 95.40 टक्क गुण घेऊन प्रथम, कु. मोरे जयराज अनिल 93 टक्के गुण घेऊन द्वितीय, तर कु . पुजारी ओम हनुमंत 92.60 टक्के गुण घेऊन तृतीय क्रम्मांक पटकावला आहे. विद्यालयात 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 08 विद्यार्थी आहेत, विद्यालयाने निकालाची उज्वल परंपरा कायम राखलेली आहे.
सर्व यशस्वी विद्याथ्य्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाच्या शिक्षकांचे मा. डॉ सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी धाराशिव तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर मा, श्री संजय डव्हळे, उपविभागीय अधिकारी मा. श्री अरविद बोळगे, तहसीलदार, मा. श्री सोमनाथ वाडकर तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन व विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांनी अभिनंदन करुन त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
