![]() |
तुळजापूर येथे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
तुळजापूर प्रतिनिधी
'बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी दिलेली शिकवण समाजासाठी आजही अतिशय उपयुक्त आहे'. असे भाष्य उमरगा येथील लेखक व व्याख्याते श्री. सुभाष वैरागकर यांनी केले, त्यांनी 'कायक वे कैलास' या सिद्धांताची महती सांगितली. 'महात्मा बसवेश्वर यांचे जीवनकार्य' या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवसमितीचे अध्यक्ष ॲड ओंकार मस्के यांनी केले, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय शुभांगीताई करिशेट्टी यांनी दिला. अध्यक्षीय समारोप प्रा. विवेक कोरे यांनी केला. आभार प्रदर्शन महेश नडमणे यांनी केले.सुरूवातीला काटगाव येथील भजनी मंडळाने सुंदर अशा पद्धतीची भजने सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. महिला व समाजबांधव यांनी कार्यक्रमास पुढाकार घेऊन परिश्रम घेतले.
यावेळी गौरीशंकर साखरे(गुरूजी),महेश नडमणे, अजिंक्य आडसकर, विक्रम बचाटे, महादेव तोडकरी, ॲड.ओंकार मस्के, सुहास कानडे, नागनाथ बचाटे, आलोक नडमणे, वीरभद्र बेलुरे, अनिल बचाटे, गोपाळ आष्टे, दयानंद पाटील, बाळासाहेब मेणकुदळे,सुहास साखरे,विवेक कोरे, कैलास मस्के, महेश तोडकरी,वरद धरणे, प्रणम्य बडुरे, कपिल धबाले, ॲड साखरे, आदित्य शेटे,मंगेश तोडकरी, वीरभद्र बडूरे, शाम तोडकरी,राजू धरणे,संदिप बडुरे,धनंजय शेटे, अस्मिता शेटे, शुभांगी करिशेट्टी, अमृता बचाटे, वैशाली धरणे, संगीता नडमणे,शिवकांता साखरे,रेश्मा कोप्पा, इंदुमती तोडकरी, संजीवनी तोडकरी,उर्मिला नडमणे,अनुराधा कोरे, शारदा बडुरे, सुनिता तोडकरी, अनुराधा नडमणे, रंजना मेनकुदळे, वैशाली बडुरे, सारिका बडूरे, इशिता तोडकरी, शैलजा आडसकर, कल्याणी कोरे यांची उपस्थिती होती.

