सहशिक्षक खंडू ताटे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

खंडू ताटे यांचा सेवानिवृत्ती निमित्त तुळजाई पत संस्थेचा वतीने सत्कार करण्यात आला. खंडू ताटे यांनी तुळजाभवानी विदयालयात सहशिक्षक म्हणून २६ वर्षे अद्यापनाचे कार्य केले आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या खंडू ताटे यांनी तुळजाई सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक सदस्य तर तुळजाई पतसंस्थेचे व्हा. चेअरमन पद भुषवीत आहेत. तुळजाई पतसंस्थेत आयोजित कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने यांचा हस्ते खंडू ताटे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी धंनजय कुंभार, अमीर शेख, भिकू कुंभार, मकसूद शेख, रामहरी भोजने, संजय देशमाने, रमेश भोजने, महेश व्हटकर, प्रा. निलेश एकदंते यांचा सह संस्थेचे कर्मचारी संक्षेप ठेव प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top