डॉ नेताजी काळे यांना पी एच डी मार्गदर्शक म्हणून मान्यता

mhcitynews
0

 


तुळजापूर प्रतिनिधी 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथील वाणिज्य प्रमुख डॉ नेताजी काळे यांना वाणिज्य विषया अंतर्गत पी एच डी मार्गदर्शक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या कडुन नियुक्ती दिली असुन डॉ नेताजी काळे यांची तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे विद्यार्थी प्रिय शिक्षक व तेवढेच शिस्तिचे प्राध्यापक म्हणून ओळख आहे,त्यांचा एकुण अनुभव १० वर्षांचा असुन आजतागायत एकुण ३७ रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले असुन एकुण ३ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.


पीक विम्याचे आर्थिक विश्लेषण या विषयावर त्यांची पी एच डी झाली असून, डॉ श्रीरंग खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली पी एच डी पूर्ण केली आहे.सत्कार समारंभात महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ सी आर दापके म्हणाल्या की, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधन कार्यास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, डॉ काळे यांच्या कडुन पी एच डी च्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडतील ज्या संशोधनाचा समाजाला चांगला उपयोग होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.सदर प्रसंगी ग्रंथपाल प्रा दिपक निकाळजे,प्रा राजा जगताप,प्रा गोकुळ बाविस्कर,प्रा विवेकानंद चव्हाण प्रा डॉ अनंता कस्तुरे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top