तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर येथे साहीत्यरत्न आण्णा भऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळा परीसर सुशोभिकरणाच्या भुमीपुजन सोहळ्यास तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब हे रविवार दि. 23 रोजी आले होते.
तुळजापूर शहरास सद्य परस्थितीला चार दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. सद्य परस्थितीला पाऊस हा बर्या पैकी चांगला झालेला आहे त्यामुळे बोरी धरना मध्ये पाण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्याची पहाणी आमदार साहेबांच्या सुचनेप्रमाने युवा नेते विनोद गंगणे, मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक पंडीतराव जगदाळे, नरेश काका अमृतराव, रत्नदिप भोसले यांनी सदरील पहाणी करुन संबंधीत बोरी धरण येथील कर्मचार्यांची चर्चा केली. सद्य स्थितीला बोरी धरणातील पाण्याची वाढ झाली असल्याची बाब संबंधीत कर्मचार्यांनी यावेळी सांगीतले आहे.
येणार्या एक- दोन दिवसा पासुन दोन दिवसाआड पाणी तुळजापूर शहरास सोडावे बाबत आमदार राणाजगजितसिंह पाटीलयांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी कुंभार यांना सुचना केलेल्या आहेत केल्याचे मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सांगितले.
