नगर परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण ; बापूसाहेब अमृतराव यांचा स्तुत्य उपक्रम

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब अमृतराव यांचा वतीने नगर पालिका शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. अमृतराव यांच्या वतीने पालिकेच्या शाळा क्रमांक क्र. २ व शाळा क्र. ३ मध्ये ३० झाडे लावण्यात आली. 


केंद्रप्रमुख मोहन भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक गणेश रोचकरी, मुख्याध्यापक तुकाराम मोटे यांच्यासह महेंद्र कावरे, सुरजमल शेटे, शिवा डाके आदींची उपस्थिती होती. यावेळी गुलमोहर, कडुलिंब, सप्तपर्णी आदी झाडे लावण्यात आली. बापूसाहेब अमृतराव यांच्या वतीने ०५ ते ०६ फुट उंचीची झाडे लावण्यात आली आहेत. मुख्याध्यापक रोचकरी आणि मोटे यांनी लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी स्विकारली आहे. बापूसाहेब अमृतराव यांनी या पूर्वी शिंदे प्लाॅटींग परीसरात ५१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. अमृतराव यांचा या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top