महेश गवळी यांची जिल्हाप्रमुख तर सत्यजित साठे यांची नूतन जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड
तुळजापूर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या धाराशिव जिल्ह्यातील निवड नियुक्त्या करण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ध्येय धोरणे पुढे घेवून जाण्यासाठी नियुक्त्या करण्यात आल्या. महेश गवळी यांच्या कार्याचा आढावा घेवून त्यांची पुन्हा एकदा धाराशिव जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करत असल्याचे स्वराज्य सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव यांनी सांगितले. यावेळी खालील प्रमुख पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. - महेश गवळी (धाराशिव, जिल्हाप्रमुख) जीवन इंगळे (मराठवाडा प्रवक्ते)- सत्यजित साठे (धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष)- औदुंबर जमदाडे (धाराशिव जिल्हा संघटक) - प्रशांत अपराध (धाराशिव जिल्हा उपप्रमुख) , महेश गोरे (धाराशिव, उपजिल्हाप्रमुख), दत्तात्रय भोसले (तुळजापूर तालुकाप्रमुख)- नागेश लोखंडे (तुळजापूर उपतालुका प्रमुख) - जीवन कदम (तुळजापूर तालुकाप्रमुख - शेतकरी आघाडी) - प्रसाद मुळे (तुळजापूर तालुकाप्रमुख - व्यापारी आघाडी) - रोहन देशमुख (तुळजापूर तालुकाप्रमुख - युवक आघाडी) - मनोज जाधव (तुळजापूर तालुका संघटक). फोटो मेलवर. - अमोल शिंदे (काडगाव सर्कल प्रमुख) - कुमार तात्या टोले (तुळजापूर शहर प्रमुख) - प्रविण गाटे (काटी सर्कल प्रमुख) - प्रशांत इंगळे (तुळजापूर तालुका उपसंघटक) - बालाजी मुळे (लोहारा तालुका संघटक) - ओंकार चौगुले (लोहारा तालुका प्रसिद्धीप्रमुख) स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव बोलताना म्हणाले की, 'स्वराज्य च्या पंचसुत्रीप्रमाणे शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य व सहकार क्षेत्रामधील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम करावे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वांना कामाला लागावे.' यावेळी सोलापूर विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख आशुतोष तोंडसे, संतोष जाधव, दादाराव बोबडे, द्वारकेश जाधव, विक्रम कदम यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
