तुळजापूर प्रतिनिधी
वृक्षमीत्र तथा महाराष्ट्र शासनान छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त समाजसेवक श्री अरूण पवार व मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने दि.१९ बुधवारी सकाळी साडेसात वाजता मोर्डा येथे वृक्षलागवडीस सुरूवात केली.या वेळी उद्घाटन प्रसंग वृक्षमीत्र अरूपण पवार सह निवृत्त डीवायएसपी सुरेश गायकवाड,धारूर चे लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार, अमोल लोंढे,मोर्डा-तडवळा सरपंच ज्ञानेश्वर पांडागळे,प्रा.रत्नाकर खांडेकर, माळकरी शाहुदादा कोळेकर,सत्यजित साठे,सोमनाथ कोरे,मारूती कारभारी,अजय पवार, जयसिंग पाटील,राम सुळे,गंगादास कोळेकर, दिलीप कोळेकर मोर्डा व धारूर गावचे शाळेचे विद्यार्थ्यां सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पिंपळ, वड,चिंच, उबंर,आंब्याची रोपे शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते लावण्यात आली. उद्घाटन प्रंसंगी वृक्षमीत्र अरूण पवार म्हणाले की शालेय विद्यार्थी विद्यार्थीनीनां वृक्षलागवडीची आवड निर्माण व्हावी,त्यांना आनंद वाटावा,पुढील पीढी वाचवायची असेल तर वृक्षलागवडी शिवाय पर्याय नाही. तुळजापूर पासून ते मोर्डा धारुर पर्यंत च्या दुतर्फा रस्त्यावर संबधित हजारो वृक्ष रोपे लावणार आहोत.या वेळी प्रा.रत्नाकर खांडेकर म्हणाले की वृक्षमीत्र अरूण पवारांचे वृक्षप्रेम हे जगजाहीर आहे त्यांनी लाखो झाडे लाऊन त्यांचे संगोपन स्वतः च्या लेकराप्रमाणे करत आहेत. तुळजापूर बायपास ते मोर्डा, धारूर, केशेगाव ते डॉ. आंबेडकर कारखान्या पर्यंत त्यांनी वृक्ष लागवड करून त्यांची जपणूक करत आहेत.तसेच पुणे येथे पिंपरी चिंचवड येथे देहू-आळंदी येथेही वृक्षलागवड केली आहे.अश्या या वृक्षमीत्र,अजातशत्रूला ईश्वर आणखी वृक्षलागवड व संवर्धन करण्याची शक्ती देवो.या वेळी वृक्षलागवडी मदत म्हणून लक्ष्मण कोनाळे,संजय पवार, राजेश घाटे,कालीदास नन्नावरे,आबा गरड,नितीन कांबळे,दत्ता शिंदे सह मोर्डा-धारूरचे ग्रामस्थांनी मदत केली.
वृक्षमित्र श्री अरूण पवार हे खास त्यांच्या जन्म गावी वृक्षारोपण करण्यासाठी रात्री पुण्याहून मोर्डा-धारूर येथे येऊन सकाळी सकाळी वृक्षारोपण उद्घाटनचा कार्यक्रम करून शेकडो वृक्ष लागवड त्यांनी व त्याच्यां सहका-यानी केले आहे.त्यांनी स्वतः वृक्ष नर्सरी तयार करून. संपुर्ण वर्षभर घरातील व सहका-याच्यां वाढदिवसाच्या प्रंसंगी अनावश्यक खर्च टाळून तो पैसा वृक्षलागवड करून त्यांचे ते संवर्धन करतात. त्यांनी आता पर्यंत पुणे,पिंपरी चिंचवड, देहु-आळंदी, तुळजापूर बायपास-मोर्डा,धारुर ,केशेगाव, डॉ आबेंडकर कारखान्या पर्यंत वृक्षलागवड करून संपूर्ण वर्षभर त्यांचे संगोपन करून पाणी घातले जात आहे.
