धाराशिव प्रतिनिधी
जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 237 होमगार्ड सदस्यांचा अनुशेष भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन पोलीस मुख्यालय,धाराशिव येथे केले आहे.त्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.
होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक,नियम व अटी याबाबतची विस्तृत माहिती https:/maharashtracdhg.gov.in/mahagh/loginI.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड, धाराशिव यांना राहील. होमगार्डमध्ये सेवा करू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंदणीकरीता अर्ज दाखल करावा.असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी केले आहे.
