तुळजापूर विधानसभा 2024 ला नेटकऱ्यांची देवानंद भाऊ रोचकरी यांना पसंती !

mhcitynews
0

सिद्दीकपटेल 

विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने उमेदवारांसोबत नेटकरीही सक्रिय झाले आहेत. तुळजापूर विधानसभेसाठी एक ऑनलाईन सर्वे करण्यात आला. यामध्ये देवानंद भाऊ रोचकरी यांना 30.41 टक्के सर्वाधिक कौल दिसत आहे तर दुसऱ्या क्रमांकावर विद्यमान आमदार राणाजगतिसिंह तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांना कौल दिल्याचे दिसून येत आहे.


म्हैस पाण्यात अन् सवदा वरी प्रमाणे अनेकांनी सध्या आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वत्र सध्या भावी आमदारांचे चांगलेच पीक बहरले आहे. यात नेटकरीही मागे नाहीत. तेही सर्वे घेऊन वातावरण निर्माण करत आहेत. असाच एक सर्वे तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी तुमची पसंती कोणाला असा ऑनलाईन सर्वे कालपासून सुरू आहे. यामध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, विद्यमान आमदार राणा जगजीत सिंह पाटील, लोकमंगल चे रोहन देशमुख, राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे, माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी असे पर्याय सुचविण्यात आले होते. या सर्वेमध्ये नेटकऱ्यांनी देवानंद रोचकरी यांना सर्वाधिक 30.41 टक्के असा कौल दिला आहे. तर विद्यमान आमदार पाटील यांना यांना 29.12 टक्के कौल दिला असून ते दुसऱ्या नंबरवर आहेत. तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांना 24.07 टक्के लोकांनी कौल दिला ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. माजी आमदार मधुकर चव्हाण यांना मात्र 8.06 टक्के लोकांनी कौल दिला. 


देवानंद भाऊ रोचकरी नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरले असल्याचे दिसून येत आहे. परंतु यासाठी अंतिम निर्णय आगामी काळात विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकीत जनता देईल त्यामुळे तुळजापूर विधानसभेसाठी आगामी काळात जनता कोणाला आमदाकरकी बहाल करेल याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top