तुळजापूर प्रतिनिधी
सन 2019-20 ते सन 2021-22 या तीन वर्षाच्या कालावधीतील धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांचा सुमारे 3 कोटी 38 लाख 78 हजार इतका भत्ता जिल्हा परिषद कडे प्रलंबित असल्याबाबत शिवशेना ( उबाठा ) अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांच्या वतीने जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना गट विकास अधिकारी पं स तुळजापूर यांच्या वतीने तक्रार देत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
तुळजापूर तालुका व सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांचा बैठक भत्ता शासनाकडे जिल्हा परिषद कडे प्रलंबित असून सन 2019-20 ते 2021-22 या तिन्ही वर्षाची मिळून तीन कोटी 38 लाख 78 हजार रुपये ग्रामपंचायत सदस्यांना वाटप झालेले नाहीत जिल्हा प्रशासनाकडे निधी उपलब्ध होऊनही पैसे का वितरित करीत नाहीत आठ दिवसात निधी वितरीत करावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनासमोर आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

