तुळजापूर प्रतिनिधी
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शक्तीपीठ तुळजापूर ते भक्तीपिठ पंढरपूर पायी दिंडी तुळजापूर वरून प्रस्थान झाले, या दिंडीचे हे सोळावे वर्ष असून या दिंडीत तुळजापूर शहरातील शेकडो महिला व पुरुष सहभागी आहेत,
या दिंडीचे प्रस्थान निमित्त निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पूजा करण्यात आली, यावेळी मा नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, भाजप शहराध्यक्ष शांताराम पेंदे, अण्णाप्पा पवार, सतीश महाराज बांडे, देविदास पवार, श्रावण पवार, चंद्रकांत पवार, विष्णू माने, आदिनाथ लोखंडे महाराज, समर्थ पैलवान, रोहित चव्हाण, गोकुळ माने, नागेश माने, विशाल तिकोने, शंभु काशीद, सुरज गाडे, राजू पवार, संजय पवार, लक्ष्मण देवकर उपस्थित होते.
तसेच यावेळी दिंडीचे प्रमुख अमर मगर, सुहास साळुंके, खंडू गवळी, सुदर्शन वाघमारे, लक्ष्मण भिसे, नाना हिबारे यांच्या सत्कार करण्यात आला.

