श्री तुळजाभवानी ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन तुळजापूर येथे शिक्षण सप्ताहातील सांस्कृतिक दिन साजरा

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव आयोजित जिल्हा शिक्षण सप्ताह पुष्प चौथे गुरुवार दि.25 रोजी 'सांस्कृतिक दिन' म्हणून साजरा केले.  यासाठी श्री तुळजाभवानी ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन तुळजापूर येथील प्रा. विवेक कोरे यांनी ऑनलाईन (झूमद्वारा) उपस्थितांना व्याख्यान दिले. 


यावेळी ते म्हणाले, शिक्षणाला चालना देण्यात सांस्कृतिक उपक्रमांची भूमिका महत्त्वपूर्ण असते तसेच सांस्कृतिक उपक्रम आत्मअभि व्यक्तीसाठी मार्ग उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांच्या भावनिक कल्याणात योगदान देतात. सांस्कृतिक उपक्रमांची अध्ययन अध्यापनाशी सांगड घालणे उपयुक्त ठरते.

सदर कार्यक्रमास जि.शि.व प्र. संस्था धाराशिव येथील प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे व सर्व अधिव्याख्याता तसेच प्राचार्य एस एन दोंड, जिल्ह्यातील सर्व अध्यापक विद्यालयातील प्राचार्य, स्टाफ व छात्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमात व्याख्यानानंतर तुळजापूर येथील छात्राध्यापकांनी गणित गीते, लेझीम, समूहगीते, गोंधळनृत्य यांचे सादरीकरण केले. तसेच रंगराज पुराणिक, संदिप रोकडे, विवेक कोरे यांनी आराधी,गोंधळी, भक्तिगीते व वाघ्या मुरळी गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शरीफ शेख तर आभार प्रदर्शन प्रा जयश्री ढाबळे यांनी मानले.

कार्यक्रमास ऑफलाईन पद्धतीने म.वि.रा. शिंदे हायस्कूलचे विद्यार्थी,मुख्याध्यापक एस बी येलगोंडे ,प्रा एस आर कोळी,प्रा उल्हास झालटे,प्रा अरूण चौधरी, प्रा शैला मोकाशे, डॉ. संजय मुरूमकर,संजय गंभीरे व छात्राध्यापक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top