कांदा उत्पादकाचे सतत च्या पावसामुळे आर्थीक नुकसान आर्थीक मदतीची मागणी

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पीकाचे उत्पादन घेतात कांदा पीकाची लागवड करण्या अगोदर त्याची रोपे तयार करावी लागतात या वर्षी शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये कांद्याची रोपे तयार करणसाठी मोठे प्रमाणात बी टाकले परंतु तालुक्यात होत आसलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यानी टाकलेले बी जमीनीत जीरुन गेले / थोडे फार उगवलेले रोपे सुध्दा जीरुन गेली आहेत.


त्यामुळे शेतकऱ्याचे बीयाणे खर्च, बैल बारदाना खर्च, सारे (वाफे) तयार करणे खर्च व फवारणी (खते) खर्च असा मोठ्या प्रमाणात खर्च वाया गेलेला आहे तालुक्यात सततच्या पावसामुळे ८०% ते ८५% कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झालेले आसुन नुकसानीची पाहणी करून कृषी विभाग व तलाठी यांना पंचनामे करून शेतकऱ्याना हेक्टरी १५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी शिव अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांनी तुळजापूर तहसीलदार यांना पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top