तुळजापूर प्रतिनिधी
श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानने दि २२-७-२०२४ पासुन आँनलाईन सशुल्क दर्शन पास चालु केले बाबत जाहीर प्रगटन काढले आहे परंतु या मुळे भाविकांचा पुजारी बांधवांशी संपर्क होणार नाही व देवीच्या पुजा विधी, कुलाचार बाबत माहीती भाविकांना होणार नाही त्यामुळे मंदीर संस्थान मार्फत सुरु करण्यात आलेले आँनलाईन सशुल्क दर्शन पास सुविधा तात्काळ बंद करण्यात यावी ही विनंती बाबत श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानचे तहसिलदार वाडकर यांना शनिवार दि. 20 रोजी निवेदन देण्यात आले. सदरील निवेदना वर मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी, अविनाश गंगणे, नरेश काका अमृतराव, नरसिंग बोदले, इंद्रजीत साळुंके, बाळासाहेब भोसले, मुन्ना साळुंके, विशाल रोचकरी, आनंद कंदले तसेच स्थानीक पुजारी बांधनवांच्या स्वाक्षरी आहेत.
