तुळजापूर विधानसभेवर महिला आमदाराच्या रूपात भगवा फडकणार !

mhcitynews
0

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे स्वप्न पूर्ण करणार - शामलताई वडणे -पवार 


सिद्दीक पटेल 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर मतदारसंघातून शिवसेनेचा आमदार व्हावा अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती महाविकास आघाडीस पोषक वातावरण असून मनमानी कारभार व जुमलेबाजीस जनता वैतागली असून सत्ता परिवर्तन अटळ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संधी दिली तर प्रथम महिला आमदार च्या रूपात तुळजापूर विधानसभेवर भगवा फडकवू असा विश्वास जिल्हा महिला आघाडी प्रमुख शामलताई वडणे - पवार यांनी व्यक्त केला.


शिवसेना महिला आघाडीच्या अभ्यासू आक्रमक व निष्ठावंत नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे संघटनात्मक कामाचा त्यांना मोठा अनुभव आहे तसेच गेल्या अनेक वर्षातून त्या शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात त्यांची ओळख आहे कुशल संघटक, दांडगा जनसंपर्क, उत्तम वक्ता व धाडसी नेतृत्व ही त्यांची खासियत आहे.


महाविकास आघाडीतून येथील जागा शिवसेना (उबाठा )कडे सुटल्यास शामल ताई या निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांनी तशी तयारीही केल्याचे दिसून येत आहे शुक्रवार दिनांक 19 रोजी शिवसेना नेते विनायक राऊत हे तुळजापूर येथे दर्शनास आले असता त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्ती साठी तुळजापूर विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी श्री तुळजाभवानी मातेला साकडे घातले. आघाडीतील तुळजापूर मतदारसंघ शिवसेने कडे राहील असा संकेत दिला ? 


लोकसभेच्या निवडणुकीत तुळजापूर मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना 52 हजाराहून अधीकची मतांची आघाडी मिळाल्याने तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून अनेक जण इच्छुक तयारी करताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीला अजून दोन महिन्याचा कालावधी असल्याने मतदार संघ हा आघाडीतील कोणत्या पक्षाकडे जाईल व उमेदवारी कोणास मिळेल हे मात्र पहावे लागणार आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top