धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव जिल्हा पोलीस घटकाची चालक पोलीस शिपाई पदांची लेखी परिक्षा दिनांक 31.07.2024 रोजी श्रीपतराव भोसले हायस्कुल, तांबरी विभाग, धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेली आहे. लेखी परिक्षेकरिता 1:10 प्रमाणे पात्र 572 उमेदवार यांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच उमेदवारांना एसएमएस द्वारे कळविण्यात आलेले आहे. महाआयटी कडून लेखी परिक्षेचे हॉलटिकीट जनरेट झालेले आहे. पात्र उमेदवारांनी दिनांक 31.07.2024 रोजी लेखी परिक्षेकरीता उपस्थित रहावे.
