"आता नाही तर परत कधी नाही" म्हणत युवा सेना पदाधिकाऱ्यांनी केला निर्धार
सिद्दीक पटेल
पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व आदित्यजी ठाकरे यांनी संधी दिली तर तुळजापूर विधानसभा लढवणार असून तुळजापूर विधानसभेला शिवसेनेचा आमदार व्हावा व भगवा फडकावा ही हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी तयार असल्याचे मत युवासेना तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी यांनी मंगळवार दि. 30 रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पदाधिकारी बैठकीत बोलताना म्हणाले.
युवा तरुण एकनिष्ठ नेता म्हणून त्यांची ओळख आहे, संघटनात्मक कामाचा त्यांना मोठा अनुभव आहे तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात त्यांची ओळख आहे, गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक अभियान राबनारा, कुशल संघटक, दांडगा जनसंपर्क, उत्तम वक्ता व धाडसी नेतृत्व ही त्यांची खासियत आहे. तालुका प्रमुख सोबतच बीड जिल्हा विस्तार म्हणून त्यांनी काम पाहात आहेत. कमी वयात भरपूर काम करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी बैठकीचे आयोजन केले होते. आगामी भूमिकेबाबत विचारले असता आता नाही तर परत कधीच नाही, महाविकास आघाडीतून शिवसेना म्हणून तुम्हीच आमदारकी लढवावी अशी कार्यकर्त्यांचे इच्छा व विनंतीला केली म्हणून मी कामाला लागलो सर्वच नेते सारखे झाले आहेत. मी बोलतो तो करूनच दाखवतो, आतापर्यंत तालुक्याचा विकास करायचा सोडून घराणेशाहीचा विकास साधला गेला. आमच्या सारखे कार्यकर्त्यांनी केंव्हा मोठे व्हायचं, युवकांसाठी रोजगार प्रकल्प, शेतीपूरक उद्योग, गाव विकास अश्या अनेक समस्यासाठी धावून जाईन, गाव दौरे करून तालुका पिंजून काढणार जीवाचे राण करीत तुळजापूर विधानसभेला शिवसेनेचा भगवा फडवणार असा निर्धार केला असल्याचे मत प्रतीक रोचकरी यांनी यावेळी बोलताना मांडले.

