तुळजापूर प्रतिनिधी
तिथक्षेत्र तुळजापूरात शहराच्या मध्यवर्तीं ठिकाणी अत्याधुनिक सेवा सुविधांसह नवीन बसस्थानक काम प्रगती पथावर असुन लवकरच हे बसस्थानक लाखो प्रवाशी भाविकांच्या सेवेत दाखल होणारआहे. हे बसस्थानक प्रशिस्त सेवासुविधायुक्त असल्याने भाविकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
बुधवार दि. 17 रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देत होत असलेल्या कामाची पहाणी केली तसेच संबंधीत ठेकेदारास सदरील कामाच्या दर्जा बाबत चर्चा करुन सदरील काम हे नवरात्र पूर्वी सदरील बस स्थानकाचे काम पूर्ण व्हावे या बाबात आदेशीत केले.
यावेळी मा नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, निलेश रोचकरी, शांताराम नाना पेंदे, अविनाश गंगणे, धाराशीवचे माजी नगराध्सक्ष अमित शिंदे आदी उपस्थित होते.

