उंच भरारी मारणाऱ्यांना वादळाचं भान नसतं

mhcitynews
0



चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं, उंच भरारी मारणाऱ्यांना वादळाचं भान नसतं

सिद्दीक पटेल 

वरील काव्यपंक्ती मधील अर्थ संघर्षमय किंवा वेगळा मार्ग निवडणाऱ्यांच्या जीवनाशी अगदीच निगडित आहे समाजातील काही ठराविक व्यक्तींना रुळलेल्या वाटेवरून चालणे कधीच पसंत पडत नाही म्हणून ते यशाच्या सिंहासनावर विराजमान होतातच.


जनसेवा आणि थेट संपर्क ही अत्यंत साधी रणनीती ठेऊन, कायम जनतेशी नाळ जोडून, समस्या निर्मूलनासाठी, यश अपयशाची पर्वा न करता, लोकशाही मार्गान संघर्ष करत समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून केलेली सेवा, वेळोवेळी साधलेला संवाद व संपर्क यामुळे तुळजापूर शहरातील दोन राज हंसाची जोडी म्हणजेच एक रामचंद्र आबा रोचकरी व दुसरे निलेश भैय्या रोचकरी हे शहरातच न्हवे तर तालुक्यात गोलाई ग्रुप च्या माध्यमातून मित्र कंपनीचा गोतावळा निर्माण केलाय. 


राजकारणापलिकडीची नाती जपणारा नेता, कार्यकर्ता अशी ओळख त्यांची ओळख असून गेल्या अनेक वर्षांपासून वर्गणी मुक्त गणपती उत्सव साजरा करून एक आदर्श निर्माण केला असून दुष्काळ काळात त्यांनी शहराच्या अनेक भागात स्वखर्चाने नागरिकांना त्यांनी टँकर द्वारे पाणी देण्याचा पवित्र असा सामाजिक कर्तव्य त्यांनी निभावले आहे.  कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. रस्ते, पाणी, लाईट, स्वच्छता यासारख्या दैनंदिन मुलभूत सुविधा सुद्धा स्व : खर्चाने त्यांनी नागरिकांना उपलब्ध करून दिली. 


जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे असो अश्या अनेक विषय मार्गी लावणारा, नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारा, प्रभागात सतत उपलब्ध होणारा, प्रभागात दौरे करून नागरिकांच्या समस्या जाणून ते दूर करणारा,  नागरिकांच्या तक्रारींची त्वरित दखल घेणारा, प्रत्यक्ष कृती करणारा शिक्षित, अभ्यासू व सभागृहात बोलणारा, पाणी, रस्ते आदी मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबर चौफेर विकास करणारा असा तुळजापूरचा भावी नगरसेवक आपल्या रूपातून होवो हिच रामचंद्र आबा आणि निलेश भैय्या तुम्हाला जन्मदिनी हिच शुभेच्छा...

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top