उत्कृष्ट अधिकारी- कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

mhcitynews
0


धाराशिव प्रतिनिधी 

आज 15 ऑगस्ट रोजी 78 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला.पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी ध्वजारोहण केल्यानंतर उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

यामध्ये कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पाटील,उमरगा तहसीलदार गोविंद येरमे,लोहारा नायब तहसीलदार सुजाता हंकारे, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या अव्वल कारकून प्रिया धाट, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक एस.के.काझी,केशेगाव येथील मंडळ अधिकारी बी.जे.मस्के, कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील तलाठी डी.व्ही.सिरसेवाड,भूम तहसील कार्यालयातील कोतवाल श्रीमंत जाधव,उमरगा तहसील कार्यालयातील शिपाई मुदगल कुलकर्णी,तुळजापूर तालुक्यातील सांगवी/मार्डी येथील पोलीस पाटील संजय बागल,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी ( शहरी विभाग) ग्रीनलँड प्राथमिक शाळेची आदिती गोडसे, छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिवची श्रेयश भागवले, श्रीपतराव भोसले हायस्कूलची श्रेया क्षीरसागर,वाशी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची हार्दिक कवडे,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८वी (शहरी भाग) कळंब येथील विद्याभवन हायस्कूलचा दर्शन भामरे,सीबीएससी शाळा पोतदार इंटरनॅशनल स्कूल,धाराशिव येथील विद्यार्थी प्रथमेश धर्मे,कृषी विभागातील स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी म्हणून अभिमन्यू काशीद, स्मार्ट प्रकल्पाचे कृषी व्यवसाय सल्लागार चेतन जाधव,आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसाद शेंडगे,महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५ मध्ये उत्कृष्ट काम केलेले सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.दीपक कदम,पशुधन विकास अधिकारी डॉ.वैभव पाटील,जिल्हा मृदा चाचणी व सर्वेक्षण अधिकारी दहिफळे,सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता बी.एम. थोरात,उमरगा तहसीलदार गोविंद येरमे,भूम व कळंबचे गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर,माझी ई शाळा अंतर्गत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील द्वितीय विजेती जिल्हा परिषद कन्या शाळा,बेंबळीची स्मृती नळेगावकर,जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श शाळा काजळा येथील गुरुप्रसाद करंडे,जिल्हा परिषद शाळा लासीना येथील संस्कृती थोरात आणि आरोग्य विभागाच्या गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमातर्गत राज्यस्तरीय मूल्यांकनाअंतर्गत राष्ट्रीय मूल्यांकनासाठी पात्र ठरलेले भूम तालुक्यातील पाथरूड,धाराशिव तालुक्यातील बेंबळी व समुद्रवाणी, तुळजापूर तालुक्यातील सावरगाव आणि जळकोट,उमरगा तालुक्यातील येणेगुर आणि नईचाकूर,लोहारा तालुक्यातील जेवळी,कळंब तालुक्यातील येरमाळा आणि ईटकुर या १० आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास तसेच इतर अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top