जनसंवाद यात्रा राबवत प्रतीक रोचकरी यांचा गावभेट दौरा
तुळजापूर प्रतिनिधी
मी मोठा नेता नसून सर्वसामान्य घरातील शेतकरी पुत्र आहे तुळजापूर विधानसभेवर भगवा फडकावा हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. त्यासाठी सर्वांनी मला साथ द्यावी तालुक्याच्या कोणत्याही प्रश्नासाठी मी सदैव तत्पर राहीन, अडचणी असतील ते मला हक्काने सांगा, पूर्वीच्या आमदाराने आतापर्यंत एखादा ही मोठा प्रकल्प तालुक्यात आणला नाही तालुक्यात बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे तालुक्यातील लाख ते दीड लाख युवक पुण्यासारख्या ठिकाणी कामाला जातात याचा विचार जनतेने केले पाहिजे युवक बेरोजगार होत गेले नेते मात्र जागीरदार होत गेले म्हणत युवकांची मोट बांधत प्रतीक रोचकरी यांनी विधानसभेला रणशिंगन फुंकले.
जनसंवाद यात्रा राबवत तालुक्यातील काटी, सावरगाव, केमवाडी, गवळे वाडी, जळकोट वाडी, वडगाव काठी, गंजेवाडी, तामलवाडी, सुरतगाव, देवकुरळी आदी गावात जनसंवाद यात्रेने गाव पिंजून काढत आहेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी युवा तरुण उमेदवार म्हणून सर्वच स्तरातून त्यांना पसंती मिळत असल्याची दिसून येत आहे महाविकास आघाडी कडून तरुणाला प्रतिनिधित्व दिल्यास तरुणांच्या हक्काचा नेतृत्व मिळेल असा मत अनेक युवकांतुन व्यक्त केला जात आहे.

