तुळजापूर विधानसभा " आखाड्याचा पैलवान "

mhcitynews
0

मधुकरराव चव्हाण वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा 


सिद्दीक पटेल 

पांढरे शुभ्र धोतर, त्यावर नेहरू सदरा....अण्णा या टोपणनावाने ओळखले जाणारे मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा विजयी झाले आहेत. वयाच्या 84 व्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांची ऊर्जा जसा महाराष्ट्र अनुभवतोय, तशीच ऊर्जा व धडपड मधुकरराव चव्हाण वयाच्या 90 व्या वर्षीही दाखवत आहेत.


तुळजापूर तालुक्‍यात 1962 मध्ये लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरूवात केली. 1967 मध्ये काकंब्रा गणातून विजयी झालेले मधुकर चव्हाण तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती बनले होते. त्यानंतर 1972 मध्ये पंचायत समितीच्या सभापतिपदी त्यांची निवड झाली. नळदुर्ग येथील तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष आणि तुळजापूर येथील कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. 1984 मध्ये कॉंग्रेसच्या वतीने उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली, मात्र त्यामध्ये डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 1990, 1995, 1999, 2004 , 2009,2014 आणि 2019 अशा सलग सहावेळा मधुकर चव्हाण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून निवडणूक लढले. पैकी 1995 व 2019 मधील निवडणुकीचा अपवाद वगळता ते प्रत्येक निवडणूकीत विजयी झाले. दरम्यानच्या कालावधीत राज्य सहकारी बॅंकेचे संचालक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, राज्य सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले. सतत 11 वर्षे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून मधुकर चव्हाण कार्यरत होते.


तुळजापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात आहे आगामी 2024 विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात असलेले मधुकर चव्हाण खऱ्या अर्थाने तालमीच्या आखाड्यात तयार झालेले पहेलवान आहेत. ते कुस्तीपटू असून, त्यांनी व्यायामातून ऊर्जा मिळवली आहे. घरचा सकस आहार, दूध आणि व्यायाम हेच चांगल्या शरीरयष्टीचे प्रमुख कारण असल्याचे ते सांगतात. दररोज सकाळी ६ वाजता त्यांचा दिनक्रम सुरू होतो. एरव्ही ते दररोज ८ ते १० गावांना भेटी देतात.


आता पुन्हा २०२४ मध्ये मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांचा दि.४ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीनाथ मंगल कार्यालय तुळजापूर येथे वाढदिवसानिमित्त विधानसभेसाठी पदाधिकारी तसेच तालुक्यातील कार्यकर्ते नळदुर्ग - तुळजापूर नगरसेवक बैठक आयोजित केले आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top