तुळजापूर विधानसभेसाठी ' तयार है हम '

mhcitynews
0


उमेदवार तयार, पक्षांच्या जागा वाटपाकडे लक्ष !


सिद्दीक पटेल 

लोकसभा निवडणुकीचे राज्यातील निकाल पाहता, विधानसभेसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. जागा वाटपाचे चित्र स्पष्ट व्हायचे असल्याने व सर्वच पक्षांमधील इच्छुकांची संख्याही मोठी असल्याने यंदा प्रत्यक्ष आचारसंहितेपूर्व हालचाली अधिक औत्सुक्याच्या ठरल्या आहेत. जोपर्यंत महायुती व महाघाडीचे आपापसातील जागा वाटप निश्चित होत नाही तोपर्यंत संभ्रमाचीच स्थिती राहणार आहे. एकदा का ते झाले, की पक्षांतरांचे सोहळे बघावयास मिळण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.


सर्वच इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. बैठका, मेळाव्यांचा सपाटा सुरू झाला आहे. पक्ष स्तरावरील ही सक्रियता वाढून गेली असली तरी महाविकास आघाडी व महायुती अंतर्गत कोणत्या जागा कुणास सुटतील हे अद्याप निश्चित नसल्याने काहीसा संभ्रम आहे. पण ज्यांना लढायचेच आहे ते मात्र वैयक्तिकरीत्या कामाला लागले आहेत. कोणी गाव भेट दौरे घेत आहे, कुणी समर्थकांना पुढे करून बैठका घेत आहे, कोण मतदारांनी आकर्षित करण्यासाठी विविध शक्कल लढवत आहेत. जागा वाटपाचा निर्णय होईल तेव्हा होईल; तोपर्यंत मिळेल ती संधी घेऊन लोकांसमोर जाण्याचे प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत. 


तुळजापूर विधानसभा मतदार संघात मात्र भावी प्रतिनिधीत्व करणारे निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. भेटीगाठी व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचून आगामी निवडणुकीसाठी 'तयार है हम' असा संदेश देत आहेत. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या रिंगणात पक्ष आपल्यावरच विश्वास दर्शविणार म्हणत, आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह जनतेला दाखविले जात आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top