नैतिक जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा

mhcitynews
0

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक 


तुळजापूर प्रतिनिधी 

बदलापूर अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बुधवार दि. 21 रोजी तुळजापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल यांना निवेदन पाठवून केले आहे.


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेच्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ कोळगाव बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर तेथील सफाई कर्मचारी यांनी अनैतिक कृत्य केले आहे त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थी पालक यांच्यामध्ये तीव्र असंतोष असून ही घटना लोकशाहीला घातक आहे हा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवून त्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी व सदरील घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत व गृहमंत्री महोदय यांनी घटनेची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे म्हंटले आहे.


यावेळी ऍड.धीरज पाटील, श्याम पवार, धैर्यशील पाटील, अमर चोपदार, उत्तम अमृतराव, अनिल शिंदे, अमोल कुतवळ, अनमोल साळुंखे,राहुल खपले,शरद जगदाळे, सुधीर कदम, चंद्रकांत सोनवणे, बाळासाहेब केसरकर, संदीप कदम, तोफिक शेख, संतोष मकरंद, बामनकर धनराज शिंदे, नवनाथ जगताप,गोविंद देवकर, संदेश माने आदिंसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top