दिनेश देशमुख यांनी इशारा देताच शहरातील खड्डे बुजविण्यास सुरुवात

mhcitynews
0

झोपेचे सोंग घेतलेले अधिकारी लागले कामाला 


धाराशिव प्रतिनिधी

शहरातील सांजा रोडवरील खड्डे बुजवण्यासह सांडपाणी बंद करण्यात यावे. अन्यथा भवानी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिनेश देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दि.४ ऑगस्ट रोजी देताच झोपेचे सोंग घेतलेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ खड्डे बुजण्यास व रोडवर येणारे सांडपाणी बंद करण्यासाठी काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहन चालकांची खड्ड्यांपासून सुटका होणार आहे. तर पादचाऱ्यांना घाण व गटारीच्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा होणारा त्रासही कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले होते की, धाराशिव शहरातील मध्यवर्ती बस स्टॅंड ते भवानी चौक सांजा रोड दरम्यानच्या रोडवरील बाजूच्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून नाल्या बुजवल्या आहेत. त्यामुळे नालीचे पाणी दोन महिन्यांपासून रोडवरून वाहत आहे. त्यामुळे बस स्टॅंड ते भवानी चौक, सांजा रोड दरम्यानच्या रोडवर प्रचंड प्रमाणात जीव घेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे जनतेला याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिक दुचाकीवरून पडून जखमी झाले आहेत. 


तर बऱ्याच नागरिकांच्या वाहणांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत मी आपल्या कार्यालयास वारंवार तोंडी माहिती दिलेली आहे. मात्र आपण खर्चाची तरतूद नसल्याचे कारण पुढे केले आहे. एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यास पैशाची तरतूद होईल का ? त्यामुळे जर ८ दिवसांत नालीचे पाणी बंद नाही झाले व खड्डे भरले नाहीत भवानी चौकात रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा देशमुख यांनी दिला होता.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top