तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर शहर येथील श्रावण बाळ व संजय गांधी योजनेतील लाभार्थी यांना कळविण्यात येते की, यापूर्वी वेळोवेळी सांगूनही सोबत दिलेल्या यादीमधील लाभार्थींयांनी आधार कार्डची झेरॉक्स , बैंक खाते झेरॉक्स व मोबाईल नंबर दिलेले नाहीत.
तरी आधार कार्डची झेरॉक्स , मोबाईल नंबर व बँंक खाते झेरॉक्स प्रत 7 दिवसाच्याआत तलाठी कार्यालय तुळजापूर येथे न दिल्यास आपणास मिळणारे मानधन/पगार बंद होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस स्वतःलाभाथीं जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी व तात्काळ कागदपत्रांची पूर्तता करावी असे आवाहन तलाठी अशोक भातभागे यांनी केले आहे
