तुळजापूर प्रतिनिधी
तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेच्या रिक्त पदांच्या भरती परीक्षेदरम्यान झालेल्या गैर प्रकाराची चौकशी करणेबाबत शिवसेना आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध संवर्गातील सरळसेवेच्या 47 रिक्त पदांच्या भरतीसाठी आयबीपीएस मार्फत परीक्षा घेण्यात आली. मात्र यापरीक्षेदरम्यान मंदिर संस्थान कार्यालयाकडून आणि आयबीपीएसकड्न मोठा गोंधळ निर्माण केल्याच्या घटना घडल्या आहेत. यात प्रामुख्याने वेगवेळ्या पदांसाठी काठिण्य पातळी नुसार परीक्षा होणे अपेक्षित असताना असे झालेले नाही. शिपाई, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, लिपिक यापदांच्या प्रश्नांमध्ये साधम्य असून या परीक्षेमध्ये या सर्वाना एकच प्रश्न पत्रिका देण्यात आाल्याचे परीक्षार्थोंचे म्हणणे आहे. सदर ऑनलाइन परीक्षिसाठी परीक्षार्थीना देण्यात आलेले युजरनेम आणि पासवर्ड परीक्षा केंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांनी लिहून स्वत:कड़े घेतले आहेत. विविध संवर्गातील पदासाठी उमेदवाराने स्वतंत्र अर्ज केल्यानंतर त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क अकारण्यात आले मात्र त्या पदासाठी एकच प्रश्नपत्रिका संबधित परीक्षार्थाना देण्यात आली आहे. परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांत प्रश्नप्त्रिका आणि उत्तरतालिका देणे आवश्यक असताना ती देण्यात आली नाही.
धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर कार्यालयात रिक्त पदांच्या भरतीची परीक्षा ही धाराशिव जिल्ह्यात होणे गरजेचे होते जेणेकरून परीक्षार्थी उमेदवारांची हेळसांड, आथिक व मानसिक कुचंबणा झाली नसती. परंतु ही परीक्षा राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी परीक्षार्थीकडून प्राप्त झाल्या आहेत. यावरून आयबीपीएस कडुन घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच ठराविक उमेदवार भरती करून घेण्यासाठी असे गैरप्रकार केला गेला असल्याची शंका निर्माण होते. यामुळे याची सखोल चौकशी जलदगतीने करणे आवश्यक असून कैलास पाटील यांनी पत्रात म्हंटले आहे.
