तुळजापूर प्रतिनिधी
कलियुगातील लोक अल्पायुषी आहेत आणि अध्यात्मिक दृष्ट्या खूप आळशी आहेत. कोणाला परमार्थाची आवड नाही, परंतु या अल्पयुषी असणाऱ्या य कलियुगामध्ये परमेश्वर प्राप्तीचा एकमेव उपाय आहे श्रीमद भागवत कथेचे श्रावण व हरिनाम घेणे या दोन सोप्या उपायांनींच कलियुगामध्ये भागवत प्राप्ती होईल असे प्रतिपादन श्रीमान श्रवणभक्ती प्रभुजी श्रीमद भागवत कथेच्या पहिल्या दिवशी त्यांनी भागवत कथेचे माहात्म्य सांगितले. शारदा मंगल कार्यालय येथील भागवत कथेच्या पहिल्या दिवशी ते बोलत होते. समाज परिवर्तन करायचे असेल तर सतत भागवत कथा आणि हरिनाम संकीर्तन यांचे आयोजन झाले पाहिजे.
"श्रीमद भागवत हे भगवत शरणागती घ्यायला शिकवते, प्रत्येक जिवाने कृष्णभावना भावित झाले पाहिजे, तसेंच जो जीव भगवत शरणागत आहे त्याची भगवन्त स्वतः काळजी वाहतात, त्यासाठी व्यक्तीने श्रद्धावान असले पाहिजे असे कथाकार यांनी भागवत कथेच्या दुसऱ्या दिवशी बोलताना सांगितले, तसेच संतांचे महत्व सांगून संतांचा संग हा आयुष्यात भगवत प्राप्ती करुन देणारा मार्ग आहे असेही त्यांनी सांगितले" कथेला ३०० ते ४०० भाविक उपस्थित होते.

