Manoj Jarange Patil | माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत केला सत्कार

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे तुळजापूर येथे आले असता त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्या जवळ महाराष्ट्राचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी शाल व पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी बोलताना मधुकरराव चव्हाण म्हणाले की या आरक्षण लढ्यामध्ये आपल्याला यश मिळावे यासाठी मी तुळजाभवानी कडे प्रार्थना करतो. त्याचबरोबर आपल्याला दीर्घायुष्य लाभो व आपण हाती घेतलेले काम पूर्ण व्हावे यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले. 


यावेळी त्यांच्या समवेत जि प चे माजी बांधकाम सभापती मुकुंद दादा डोंगरे, युवा नेते ऋषिकेश मगर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अभिजीत चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, रुपेश बोबडे, सतीश महामुनी, बबन जाधव यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top