मतदारसंघातील 90 गावात संवाद यात्रा करत घेतली आघाडी
सिद्दीक पटेल / तुळजापूर
येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका लागणार असून, धाराशिव जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात यंदा निर्भीड आणि तडफदार असलेले युवा सेना राज्य विस्तारक प्रतीक रोचकरी यांचाच आवाज घुमणार असल्याचे दिसत आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या व सर्वसामान्यांना माणसाच्या समस्या जाणुन घेण्यासाठी तालुक्यात संवाद यात्रा दौरा करत आघाडी घेतली आहे ! युवा ते सर्वसामान्य मतदार राजा कडून प्रतीक रोचकरी यांचे गावोगावी जंगी स्वागत करण्यात येत. असुन त्यांच्या संवाद यात्रा दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
विधानसभेची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर प्रतीक रोचकरी हे सध्या मतदारसंघात फिरत आहेत. याच अनुषंगाने तालुक्याचा दौरा करून तालुका पिंजून काढला आहे त्यांना चांगला प्रतिसाद ही मिळत आहे. तालुक्यातील एकूण 50 गावास तर धाराशिव मतदार संघातील 72 गावातील 40 गावांना भेटी देत मतदार संघ पिंजून काढत आघाडी घेतली आहे.
तुळजापूर मतदारसंघात प्रस्थापित नेत्यांनी कित्येक वर्ष सत्ता गाजवलेली आहे. प्रस्थापित पुढाऱ्यांनी राजकारणा व्यतिरिक्त सर्वसामान्यांचा कोणताही विकास केलेला नाही आणि त्यांना या मतदार संघातील जनता कंटाळलेली आहे म्हणून प्रतीक रोचकरी या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या व शिवसेना उबाठा पक्षा सोबत प्रामाणिक असणाऱ्या युवकाला संधी देण्यात यावी असा सूर सर्व समाज घटकातून उमटत आहे व त्यांच्या गाव खेड्यातील भेटी दौऱ्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे कारण त्यांनी आतापर्यंत सर्वसामान्य जनता व युवक यांच्यासाठी केलेले काम उल्लेखनीय आहे म्हणूनच त्यांनी तुळजापूर विधानसभेची निवडणूक लढवावी अशी इच्छा सर्वसामान्य जनतेतून संवाद यात्रेच्या दरम्यान अनेकांनी व्यक्त केली.
