अतिरिक्त खर्च टाळत 2 मुलींच्या नावे केले फिक्स डिपॉझिट
तुळजापूर प्रतिनिधी
गणेशोत्सव जवळ आला की गणेशोत्सव कसा साजरा करावा?डॉल्बी, गुलाल पाहिजे का नको? अशा अनेक गोष्टींवर चर्चा होते. तर काही गणेशोत्सव मंडळे खुप चांगलं काम करुन समाजाला आदर्श देत असतात.
तुळजापूर शहरातील त्रिशक्ती तरूण मंडळा तर्फे एक अनोखा उपक्रम राबवत समाजात एक आदर्श निर्माण केले आहे मंडळाचे जेष्ठ सभासद कै.सुजित साळुंके यांच्या निधनानंतर साळुंके परिवारावर शोककाळा पसरली असून यंदा मिरवणुकीचा अतिरिक्त खर्च टाळत त्रिशक्ती तरुण मंडळाने परिवाराला एक आधार म्हणून त्यांच्या पाश्चात असलेल्या 2 मुलींच्या नावे एक लाख 11 हजार इतकी वर्गणी गोळा करुन फिक्स डिपॉझिट करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी युवा नेते विनोद गंगणे, महंत वाकोजी बाबा, महंत मावजीनाथ बाबा, महंत व्यंकट अरण्य बाबा, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, औदुंबर कदम, किशोर साठे, शिरीष कुलकर्णी, किशोर गंगणे, शिवाजी बोधले, अमर हंगरगेकर, शांताराम पेंदे, धैर्यशील दरेकर, पत्रकार श्रीकांत कदम, गुरुनाथ बडुरे, सचिन ताकमोघे त्याचबरोबर त्रिशक्ती तरूण मंडळाचे आधारस्तंभ नरेश काका अमृतराव, संतोष छत्रे व मंडळाचे सभासद सूरज छत्रे, शितल अमृतराव, शिवाजी हाके, श्रीकांत छत्रे, पिंटू कामे, बालाजी वाघे, सोनू कोळगे, सौदागर पॅाळ, नाना अमृतराव, प्रेम पुजारी, महेश पुजारी, बालाजी बेरगळ, अमित छत्रे, आप्पा गायकवाड, शुभम छत्रे, सिद्धिराज कामे, निलेश अमृतराव सह हजारोच्या संख्येने नागरिक महिला उपस्थित होते.
