तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर सोलापूर महामार्ग लगत असलेल्या बारालिंग रस्त्यावरील पथदिवे व मार्गदर्शक फलक बसविणे बाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना मंगळवार दि. 24 रोजी स्थानिक नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले
दिलेल्या निवेदन नमूद केले आहे की, शारदीय नवरात्र महोत्सव काळात श्रीक्षेत्र तुळजापूर येथे देवी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त तुळजापूर येथे येत असतात नवरात्र उत्सव काळात व पौर्णिमे दिवशी पायी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. यामध्ये सोलापूर येथील भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात त्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून तुळजापूर सोलापूर महामार्ग लगत असलेल्या बारालिंग रस्त्यावरील पथदिवे लावून, मार्गदर्शक फलक बसवून भाविकांची गैरसोय टाळावी. गतवर्षी या मार्गांवर एका मृतदेह आढळून आला असल्याचे निवेदनात सांगितले आहे.
निवेदनावर अनिकेत अमृतराव, राम चोपदार, भारत कोळगे, सौदागर पौळ, उदय गपाटे, गणेश गंधुरे, दादाराव जमदाळे आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
