तुळजापूर प्रतिनिधी
स्व.धन्यकुमार काका क्षिरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी ‘भव्य रक्तदान शिबिर’ बुधवार दि.25 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वा. श्रीकृष्ण मंदिर विश्वास नगर, तुळजापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार असल्याचे आयोजक दिनेश अण्णा क्षीरसागर यांनी म्हटले आहे जास्तीत जास्त सहभाग घेऊन श्रेष्ठदानाचे कर्तव्य पार पाडावी असे आवाहन हि क्षीरसागर यांनी केले आहे.
रक्तदानाचे फायदे
1. हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. शिवाय, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकादेखील कमी होतो. रक्तामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यास हृदयाला यामुळे नुकसान होण्याचा धोका असतो, असे म्हटले जाते. नियमित स्वरुपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
2. लाल रक्तपेशींमध्ये वाढ रक्तदान केल्यानंतर तुमचे शरीर रक्ताची कमतरता भरुन काढण्याचे कार्य सुरू करू लागते. यादरम्यान, शरीरात लाल रक्तपेशी अधिक प्रमाणात निर्माण होतात. यामुळे तुमचे आरोग्य सुधारू लागते आणि शारीरिक कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं होतात.
3. वजन घटते रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटण्यासही मदत होऊ शकते. शरीरात लाल रक्तपेशींचा स्तर योग्य प्रमाणात येण्यासही मदत होते. यादरम्यान, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करुन वजन नियंत्रण आणले जाऊ शकते. पण म्हणून वजन कमी करण्यासाठी रक्तदान करणे हा योग्य मार्ग ठरू शकत नाही. रक्तदानाची प्रक्रिया केवळ निरोगी आरोग्य राखण्याचे माध्यम आहे, वजन घटवण्याच्या योजनेतील हिस्सा नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रक्तदान करावे.
4. कॅन्सरचा धोका कमी रक्तदान केल्यानं शरीरात अधिक प्रमाणात असणारे लोह नियंत्रणात आणण्यास मदत होते. यामुळे कॅन्सरचा धोकादेखील कमी होतो. 5. निरोगी आरोग्यरक्तदानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते, रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
6. आरोग्य तपासणी आरोग्यदायी फायद्यांव्यतिरिक्त रक्तदान प्रक्रियेमध्ये रक्तदानापूर्वी तुमचे रक्त आणि आरोग्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासली जाते, संसर्ग, आजारांची तपासणी केली जाते. रक्तचाचणीद्वारे एखादी व्यक्ती रक्तदान करण्यास सक्षम आहे की नाही, याची माहिती मिळते. यामुळे नियमित स्वरुपात रक्तदानामुळे तुम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्यरितीने देखभालही करू शकता.
