टपाल विभागातर्फे कुंभारी येथे "डाक चौपाल" महामेळावा कार्यक्रम संपन्न

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

टपाल विभागातर्फ कुंभारी ता तुळजापूर येथे पोस्ट ऑफिसचे विविध योजना प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्यासाठी डाक चौपाल हा कार्यक्रम डाकघर अधीक्षक श्री एस एन आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवर दि. 28 रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाला गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.


प्रथम सकाळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. डाक सेवा- जनसेवा, बेटी पढाओ -बेटी बचाओ, इंडिया पोस्ट- सबका दोस्त अशा घोषणा देण्यात आल्या. 


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डाक निरीक्षक अनिल जाधव यांनी पोस्ट ऑफिस मधील विविध योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. यामध्ये बचत खाते, टी डी (एफ डी),महिला सन्मान ,सुकन्या समृद्धी ,५५० रुपयांमध्ये १० लाख विमा कवच , पेमेंट बँक खाते आदि विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी डाक विभागाचे विपणन अधिकारी मोहन सोनटक्के यांनी देखील विविध योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले.


सदरील कार्यक्रमासाठी तुळजापूर डाकघर निरीक्षक अनिल जाधव , विपणन अधिकारी मोहन सोनटक्के , एम सी काटकर ,कुंभारी पोस्टमास्तर, नागनाथ वडणे , सरपंच नागेश कोळी ,उपसरपंच संतोष क्षीरसागर , जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक शेख सर ,गायकवाड सर, विष्णू वडणे , अंगद इंगळे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लक्ष्मण लोमटे , अभिजित वाले , सूरज गरड , कार्तिक धरगुडे आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन  काटकर यांनी केले तर आभार श्री नागनाथ वडणे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top