मेळाव्यास शेतकऱ्यांची तुफान गर्दी
सिद्दीक पटेल
विधानसभेची निवडणूक कधीही लागू शकते जसजशी निवडणूक जवळ येत आहे तशी राजकीय फड रंगत आहेत जिल्ह्यातील सर्वांच्या नजरा तुळजापूर विधानसभे कडे लागून आहेत. येथून अनेक भावी आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत एक दिवसाआड एक इच्छुक नव्याने तयार होत आहेत नेत्यांची भेट घेत आपण इच्छुक असल्याचे सोशल मीडियाद्वारे प्रचार व प्रसार करीत आहेत भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात सर्वच इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली असून गावोगावी बैठका घेत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून इच्छुक असलेले नळदृर्ग येथील उद्योजक अशोक जगदाळे मात्र गावोगावी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत गावोगावी जात कार्यक्रम घेत मतदारांशी संवाद साधत आहेत महिलांसाठी त्यांनी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम घेत संपूर्ण तालुका पिंजून काढला तर शेतकरी बांधवांसाठी विविध ठिकाणी भव्य शेतकरी मेळावे घेत शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. तसेच बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावे मुलाखत पूर्व प्रशिक्षण घेत आहेत.
खेळ पैठणीचा असो भव्य शेतकरी मेळावा अशो अथवा बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावे असो एकंदरीत पाहता अशोक जगदाळे मतदार संघ गाजवत असल्याचे दिसत आहे गावोगावी, वाड्या वस्तीवर त्यांचीच चर्चा होताना दिसून येत आहे.
तुळजापूर विधानसभा सभेसाठी हे आहेत इच्छुक उमेदवार
काँग्रेसचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील, माजी नगराध्यक्ष देवानंद भाऊ रोचकरी, युवा सेना राज्य विस्तारक प्रतिक रोचकरी, भाजपचे बसवराज मंगरुळे, सुधाकर गुंड, स्वराज पक्षाचे महेश गवळी हे उमेदवार इच्छुक आहेत.
