धाराशिव प्रतिनिधी
डॉ. बापुजी साळुंखे विधी महाविद्यालय येथे दि.०५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षकदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधुन सर्व शिक्षक वृंदांचा फेटा बांधून यथोचीत सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी शिक्षकांप्रती आपली मते व्यक्त केली.
यावेळी प्रा.डॉ.शिंदे सर , प्रा.डॉ.कुंभार सर , प्रा. डॉ.शहा सर, प्रा.डॉ.आंबेकर सर, प्रा.डॉ.कोल्हे मॅडम, प्रा. डॉ.पूनम तापडिया मॅडम, प्रा.अजित शिंदे सर, प्रा. कैलास शिकारे सर, प्रा. सिद्दीकी मॅडम, ग्रंथपाल गायकवाड सर, यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील जगताप, सार्थक सुरवसे, ओंकार आळंगे, आचल जानराव तसेच सर्व विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई देशमुख हिने तर आभार प्रदर्शन दिलीप सलगर यांनी केले.

