तुळजापूर प्रतिनिधी
नळदुर्ग रोड पुजारी नगर येथे यंदा प्रथमच होत असलेल्या सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाच्या बैठकीत पुजारी नगरचा राजा गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी विशाल शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पुजारी नगरचे संस्थापक गणेश पुजारी,महेश पुजारी प्रमुख उपस्थितीत गणेशोत्सवाची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्ष विशाल शिंदे, उपाध्यक्ष देविदास पुजारी, सचिव प्रतीक मोरे,सागर धनके, धनंजय शिंदे, दिपक चौगुले, विनायक बेरगळ,सिध्दराज कोळेकर, नागनाथ पुजारी,कृष्णा पुजारी,आदिनाथ पुजारी, प्रेम पुजारी,कालिदास पुजारी,अक्षय शिंदे,सौरभ राऊत,शुभम राऊत आदींची उपस्थिती होती.
प्रथमच साजरा होत असल्याने पुजारी नगर मंडळातर्फे महिलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करत विजेत्यांना पैठणीची भेट दिली जाणार आहे.
