प्रौढ बीसीजी द्वितीय लसीकरण सत्राचे शुभारंभ

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

२०२५ पर्यंत संपुर्ण भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन च्या वतीने शहरी आयुष्यमान आरोग्य मंदिर (सरकारी दवाखाना) जिजामाता नगर तुळजापूर येथे प्रौढ बीसीजी द्वितीय लसीकरण सत्राची शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते तथा जिजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शेळके व वैद्यकीय अधिकारी डॉ निपाणीकर मॅडम आपले मत व्यक्त केले.


यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आवटे सर, आरोग्य पर्यवेक्षक यांनी लसीकरण सत्रास उपस्थित राहून उपस्थित नागरिकांना माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरी आयुष्यमान आरोग्य मंदिर चे वैद्यकीय अधिकारी डॉ शरयू निपाणीकर मॅडम, आरोग्य कर्मचारी अभिलाषा सुरवसे, एम एम माने, मगर, ओमकार वाघमोडे, माधुरी कुंभार परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top