शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
तुळजापूर प्रतिनिधी
राज्यभरात होणारे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तात्काळ शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्य महिला आघाडी समन्वयक तथा उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेत्या छाया शिंदे, संपर्क संघटक रोशनी कोरे गायकवाड, निरक्षक संजना मुणगेकर,धाराशिव जिल्हा महिला संघटक शामल वडणे, जिल्हा संघटक जिनत सय्यद, उपजिल्हा संघटक ललिता सावंत,पौर्णिमा लांडगे, तालुकाप्रमुख सुरेखा मुळे,भुम तालुकाप्रमुख उमादेवी रणदिवे,शहरप्रमुख ज्योती अडागळे, स्वर्णमाला नारायणकर, शोभाताई शिंदे, प्रियंका माशाळकर, दुबेताई,सुलोचना रसाळ आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील महिलांच्या संरक्षणासाठी आणि न्याय जलद आणि प्रभावीपणे दिला जाण्यासाठी शक्ती कायदा महत्त्वपूर्ण आहे, या कायद्याची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राज्यभर स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
